आमच्याबद्दल काही शब्द


समस्त पार्लेकर, देणगीदार, जाहीरातदार व शुभचिंतक हो! आपणांस कळविण्यात ब्रह्मानंद होत आहे की, पेशवा परिवारांचे २०२२ साली ३४ वर्ष पूर्ण झाले . बाळ गोपाळ मित्र मंडळाची स्थापना १९८९ साली झाली त्यावर्षी शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांनी वरीष्ठांनी सोबत घेऊन रही व खाऊचे पैसे एकत्र जमा करुन गणपतीची मुर्ती विकत घेऊन त्या मुर्तीची स्थापना केली होती. ही परंपरा आज देखील मंडळ चालवत आहे. २००१ साली सर्व कार्यकत्यांनी एकत्र येऊन मंडळाला विलेपार्ल्याचा पेशवा हे नाव दिले व तिथून मंडळाचा प्रवास सुरु झाला.

पौराणिक कथावर चल चित्रांचा प्रयोग यशस्वी ठरला व तो आज देखील कायम आहे. गेली दहा वर्षे आम्ही प्रदुषण, पाणी, तंबाखू, रक्तदान, एड्स, सैनिक असे अनेक ज्वलंत विषयांवर चल चित्रामार्फत प्रेषकांसमोर मांडले आहेत व याचा प्रचंड प्रतिसाद सुध्दा गणेशभक्तांकडून आम्हाला मिळाला आहे. रक्तदान शिबीर, कॅन्सर पिडीतांना मदत, गरीब मुलांना शिष्यवृत्ती, आदीवासी पाड्यांना गरजुंना धान्य, कपडेदान, थंडीतून रस्त्यावर झोपणारे गरीबांना मायेची चादर, असे अनेक सामाजिक उपक्रम करत आलेली आहोत व यापुढेही करत राहू.

यशाच्या शिखरावर माणूस जाऊन बसला पण त्याचे कौतुक करणारं, मायेची थाप देणारं कोणी उरल नाही अशाच ज्वलंत समस्या दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापुढे सादर करत राहू

श्री गणेशाच्या आशिर्वादाने २००८ पासुन साकारलेली श्रीं ची टिश्युपेपर युक्त कागदी मुर्तीचे यंदा हे १५ वर्ष पूर्ण झाले. सर्वप्रथम मुंबईतील एकमेव टिश्युपेपर कागदी मुर्ती असल्याने २०१६ साली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व साऱ्या गणेशभक्तांनी एकत्र येऊन मंडळाला मुंबईचा पेशवा, विलेपार्ले ही नवी ओळख प्राप्त करुन दिली.

आपला नम्र पेशवा परिवार

मुंबईचा पेशवा फोटो गॅलरी

मुंबईचा पेशवा व्हिडिओ गॅलरी



L
o
a
d
i
n
g

संपर्क साधा

    पत्ता

    सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी, श्रद्धानंद रोड , आकाश किरण सोसायटी, नवापाडा, विलेपार्ले ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००५७.


    ईमेल

    balgopalmitramandal7@gmail.com